
परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ घडलेल्या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्या प्रकारामुळे संतप्त जमाव आक्रमक बनला, ज्यामुळे हिंसाचार उफाळून आला. मंगळवारी (ता. १०) सायंकाळी स्टेशन रोड परिसरात घडलेल्या या घटनेने शहरातील शांतता भंग झाली.