

Parbhani News
esakal
परभणी: गतवर्षी तब्बल १५० टक्के पाऊस पडूनही यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढवण्याची चिन्हे दिसत आहेत. जलसाठा कागदावर समाधानकारक असला तरी प्रत्यक्षात स्थानिक जलस्रोत आटण्याची भीती, भूजल पातळीत झपाट्याने होत असलेली घट, विस्कळीत वितरण व्यवस्थेमुळे ग्रामीण भागातील अनेक गावांवर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. प्राथमिक सर्वेक्षणाने परिस्थितीची तीव्रता अधोरेखित केली असून तब्बल ५५ गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा फटका बसू शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.