esakal | परभणी : वालूर शिवारातील शेतातील बोअरवेलमधून पाण्याचा झरा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सुरुवाती पासूनच सेलू तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. आठ दिवसांच्या उघडीपी नंतर  गुरुवारी सायंकाळी मेघगर्जना होऊन जोरदार मुसळधार पाऊस झाला.

परभणी : वालूर शिवारातील शेतातील बोअरवेलमधून पाण्याचा झरा

sakal_logo
By
संजय मुंडे

सेलू (जिल्हा परभणी) : सेलू तालुक्यातील वालूर व परिसरात गुरुवारी (ता. 22) संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला. यंदाच्या झालेली अतिवृष्टी, सतत पडलेल्या मुसळधार पावसाने एक बोअरवेल मधून ओसंडून वाहत आहे. 

सुरुवातीपासूनच सेलू तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. आठ दिवसांच्या उघडीपीनंतर गुरुवारी सायंकाळी मेघगर्जना होऊन जोरदार मुसळधार पाऊस झाला. ऑक्टोंबर महिन्यात परतीचा पावसाने तर सेलू तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीन, कापूस हातचा गेला. काही ठिकाणी शेत शिवारातील राहिलेला कापूस एकदाच भरमसाठ वेचणीस आला. कापूस वेचणीस प्रतिकिलो सात ते आठ रुपये दर करूनही कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नाहीत.  पुन्हा पुन्हा कोसळत असलेल्या पावसामुळे  बळीराजा मेटाकुटीस आला आहे. 

वालूर (ता.सेलू) शिवारातील गट क्रमांक-२९० मध्ये असलेल्या  शेतकरी मोहम्मद सइद बागवान यांच्या शेतातील बोअरवेलमधून आपोआप ओसंडून पाणी वाहत आहे. या शिवारातील कापूस एकदाच वेचणीस आल्याने मजूर मिळत नाहीत. काही शेत शिवारातील शेतात पाणी साचल्याने जाता येत नाही. 

संपादन - प्रल्हाद कांबळे