esakal | परभणी : झरीच्या युवकांनी केला हजार वृक्षलागवडीच संकल्प
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची संकल्पना पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न

परभणी : झरीच्या युवकांनी केला हजार वृक्षलागवडीच संकल्प

sakal_logo
By
अनिल जोशी

झरी (जिल्हा परभणी) : झरीचे भूमिपुत्र तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून घरी येथील जिंतूर परभणी रोडवर एक हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प झरी येथील युवक स्वयंप्रेरणेने घेतला आहे.

यामध्ये संपूर्ण गावकऱ्यांनी खारीचा वाटा म्हणून ट्रॅक्टर जेसीपी श्रमदान आदीतून आपला मोलाचा वाटा उचलला आहे. ग्लोबल वार्मिंग सारख्या  समस्येतून तोडगा काढण्यासाठी तसेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी आपल्या गावातही काही केले पाहिजे, या संकल्पनेतून या युवकांनी एक हजार वृक्षलागवडीचा व पालनपोषणाचा संकल्प केला आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर वृक्ष लागवडीसाठी सदैव आग्रही असतात. याच संकल्पनेतून आपल्या गावातही लागवड झाली पाहिजे. ही संकल्पना त्यांनी कार्यकर्त्याकडे व्यक्त केली होती. त्याचे श्रेय म्हणून महेश मठपती, गजानन देशमुख, दत्तप्रसाद अग्रवाल, विशाल देशमुख, संतोष देशमुख, नारायण गवळी, किशोर देशमुख, दादाराव देशमुख, योगेश शिरडकर, उत्तम जगाडे यांनी ही संकल्पना साकारण्याचा प्रयत्न केला. त्यास गावकऱ्यांनी साथ देऊन वृक्षसंवर्धनाची लागवड करण्याचा संकल्प घेतला.

हेही वाचाशंकरनगर येथील ‘त्या’ अत्याचार पिडीत मुलीस मिळाला हक्काचा निवारा -

विशेष म्हणजे या युवकांनी नुसती लागवड न करता त्या वृक्षांची जोपासणे करण्याचा संकल्पही केला आहे. जिंतूर परभणी रोडवर दुतर्फी पाच फुटाच्या अंतरावर हे वृक्ष लागवड करणारे येणार आहे. आपल्या गावातील एक मोठ्या अधिकाऱ्याची संकल्पना गावकऱ्यांनी त्याची प्रेरणा घेऊन हा संकल्प केल्याचे सकाळ'शी बोलताना महेश मठपती यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे सद्यस्थितीला वृक्ष लागवड काळाची गरज या प्रेरणेतून आपल्या गावातील भूमिपुत्रांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन वृक्षलागवड करत असल्याचे गजानन देशमुख यांनी सांगितले.

साडेतीन साडेतीन एक मुहूर्त असलेल्या दसऱ्याच्या दिवशी झाडे लावण्यास आम्ही सुरुवात केली या मागचा उद्देश केवळ झाडे लावून असून झाडे कसे जगतील याकडे आमचे संपूर्ण लक्ष राहील केंद्रेकर साहेब यांच्या पेरणे आम्ही हा कार्यक्रम करत आहोत तसेच अमित गांधी सर यांचेही मोठे योगदान लाभल्यामुळे हा कार्यक्रम आणि घेऊ शकलो

- महेश मठपती, सामाजिक कार्यकर्ते 

जरीचा भूमिपुत्र असलेली साहेब श्री केंद्रे कर सर नेहमी वृक्ष लागवडीकडे लक्ष देतात वनरक्षक कसे जगतील याकडे सातत्याने त्यांची नेहमी लक्ष असते हीच प्रेरणा घेऊन आम्ही एक हजार झाडांची वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे

 - गजानन देशमुख, माजी सरपंच झरी

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top