परभणी : प्रशासनाच्या चुकीमुळे झरीकरांची धावपळ, काय आहे प्रकरण वाचा...

file photo
file photo

झरी ( जिल्हा परभणी) : झरी ता परभणी येथील गतवर्षीपासून शासनाने आधार कार्ड सक्तीचे केले असल्यामुळे अनेकांना या आधार कार्डवर स्कीम किंवा आधार कार्डचा उपयोग होत आहे पण अशातच केवळ अंक एक अंक चुकल्यामुळे अनेकांना आपल्या व्यवहाराचा फटका बसत आहे

त्याचे असे झाले की झरी तालुका परभणी येथील पोस्टल पिन 431540 आहे. परंतु गेल्या सहा महिन्यापासून तालुक्यातील झरी हे नाव काढल्यानंतर पोस्टर पिन 4315 05 असल्यामुळे सदरील आधार कार्ड किंवा प्लेन कार्ड हे सरळ जरी तालुका पाथरी येथे अनेक आधारचे गठ्ठे पडले असल्याचे माती माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. ज्या व्यक्तीला आधार कार्डची गरज आहे त्या व्यक्तींना थेट मानवत गाठावे लागल्यामुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याबाबत झरी येथील आधार केंद्रावर विचारणा केली असता 431540 हा पिन कोड एक्सेप्ट करीत नसल्याचे त्यांनी सांगितले. सदरील पूर्ण व्यवहार मुंबईहून चालत असल्यामुळे याबाबत आम्हाला हस्तक्षेप करता येत नसल्याची माहिती संबंधितांनी दिली जनसामान्य व्यक्तींना आधार कार्ड हे अनन्य साधारण झाल्यामुळे मानवत ला गेल्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे सामान्य जनतेतून आवाज निघत आहे. याबाबत येत्या काही दिवसात झरी वाशीयाकडून निवेदन देऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे

मी माझ्या मुलाच्या आधार कार्ड गेल्या दोन महिन्यापासून पोस्टकडे विचारणा करत होतो परंतु काही कामानिमित्त मी मानवत ला गेलो असता मानवत पोस्ट ऑफिस मध्ये गेलो असता माझ्या मुलाचे आधार कार्ड त्या ठिकाणी उपलब्ध झाले

- संतोष कलाने, झरी

सामान्य जनतेची गैरसोय होत असल्यामुळे पुढील प्रशासनाने या वेळी पावले उचलून जनतेची गैरसोय टाळावी

- विशाल देशमुख, सामाजिक कार्यकर्ते झरी

स्पर्धेच्या युगामध्ये अनेक युवकांना पिनकोड चुकीमुळे स्पर्धेपासून मुकावे लागत आहे तेव्हा शासनाने याची वेळीच दखल घ्यावी

- ब्रह्मानंद सावंत ,अध्यक्ष तंटामुक्ती झरी

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com