कोरोनाची भिती संपवून परभणीकरांचे 'न्यु ईअर सेलिब्रेशन'

गणेश पांडे
Friday, 1 January 2021

शहराजवळील प्रेक्षणिय स्थळे हाऊस फुल्ल, शहरासह आजू -बाजूची हॉटेल्स गर्दीने फुलली

परभणी ः कोरोनाच्या महाभयंकर संकटातून थोडंस बाहेर पडत परभणीकरांनी न्यु ईअरचे मनसोक्त सेलिब्रेशन केले. तब्बल आठ महिण्यापासून घराच्या चार भिंतीत अडकलेल्या परभणीतील नागरीकांना 31 डिसेंबर ही पर्वनीच ठरली. त्यामुळे शहरातील सर्व हॉटेल्स, फुड कॉर्नर इतकेच काय तर शहरालगत असणारे फन पार्क, अॅग्रो टुरीजम व इतर फार्म हाऊसमध्ये परभणीकरांनी आप - आपल्या कुटूंबासोबत जावून नवीन वर्षाच्या स्वागत सोहळ्याचे साक्षीदार बनने पसंत केले.

कोरोना विषाणु संसर्गाचा राज्यात प्रसार झाल्यानंतर मार्च महिण्यात सर्वात आधी जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेत जिल्हा बंदी जाहिर केली. त्या पाठोपाठ झालेल्या लॉकडाऊन व संचारबंदीमुळे शहरासह जिल्ह्यातील नागरीक कैद झाले होते. व्यापार बंद, शाळा बंद इतकेच काय संचारबंदीमुळे कुठे फिरणे ही बंद झाले. मित्रांशी कट्ट्यावर बसून गप्पा नाही. हा प्रकार तब्बल आठ महिणे चालला. अजूनही लोक म्हणावे त्या पध्दतीने घराच्या बाहेर पडतांना दिसत नाहीत. वर्षातील सण, उत्सवांवर देखील कोरोनामुळे विरजन पडले. त्यामुळे नजर कैदेत असणाऱ्या परभणीकरांना 31 डिसेंबर हा दिवस पर्वनीच ठरला. कारण कोरोनाचा प्रसार काही अंशी कमी झाला व त्यातच लसीकरण नजरेच्या टप्प्यात आल्याने परभणीकरांचा जीव भांड्यात पडला आणि त्यांच्या उत्साहाला उधान आले.

हेही वाचा नांदेड : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करा- संजय बेळगे

नववर्षाचे स्वागत जल्लोषात...

31 डिसेंबर रोजी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी परभणीकरांनी दोन दिवस आधीपासूनच तयारी केली होती. त्यामुळे परभणीकरांची आतूरता ओळखून शहरातील हॉटेल्स व फन पार्कवाल्यांनी तशी तयारी सुध्दा केली होती. या व्यवसायीकांचे व्यवसाय देखील तब्बल आठ महिणे बंद होते. त्यामुळे 31 डिसेंबर कॅश करण्यासाठीही या व्यापाऱ्यांनी तयारी केलेली दिसून आली. त्यामुळे लोकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. मनसोक्त खाने, फिरणे व कुटूंबासोबत वेळ घालवणे हा 31 डिसेंबरच्या दिवसभराचा प्लॅन परभणीकरांनी आखला होता.

जल्लोषासह सावधानता ही...

कोरोना विषाणुचा संसर्ग अजून म्हणावा तितका कमी झालेला नाही. त्यातच नवीन कोरोना विषाणुच्या चर्चेने परभणीकरांना अधिकच सतर्क बनविले आहे. त्यामुळे नववर्षाचा जल्लोष तर साजरा करायचा परंतू कोरोना चे नियम पाळूनच असे ठरवूनच परभणीकरांनी नववर्षाचे स्वागत जल्लोषातच केले. हॉटेल्स वाल्यांनी देखील सॅनियाझर, सोशल डिस्टसिंगचे तंतोतत पालन होईल याची दक्षता घेतल्याचे दिसून आले.

आम्ही कोरोना विषाणु संसर्गा संदर्भात प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन सुरु केले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी लोकांची आमच्या कडे होणारी गर्दी पाहता, आम्ही सॅनिटायझरसह सोशल डिस्टसिंगचे पालन करण्याचे पूर्ण प्रयत्न केले.

- डॉ. संजय टाकळकर, श्रीराम बाग अॅग्रो टुरीझम, परभणी

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhanikar's 'New Year Celebration' parbhani news