परभणीतील उद्योग अडकले ‘कंटेंटमेंट झोन’मध्ये !

file photo
file photo
Updated on

परभणी : येथील औद्योगिक वसाहतीचा परिसर कंटेंटमेंट झोन परिसरात येत असल्याने सध्यातरी त्या भागातील एकही उद्योग सुरू झाला नाही. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयितांच्या दुसऱ्या चाचणीचा अहवाल आल्यानंतरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
परभणी शहरात गुरुवारी (ता. १६) कोरोनाचा रुग्ण अढळून आला. त्यामुळे तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच संबंधित रुग्ण ज्या भागात आला होता, त्यापासून तीन किलोमीटरचा परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. त्या परिसरात औद्योगिक वसाहत येते. केंद्र आणि राज्य शासनाने ता. २० एप्रिलपासून उद्योग सुरू राहतील, असे आदेश काढले आहेत. परंतु, परभणीतील उद्योगाचा परिसर हा कंटेंटमेंट झोनमध्ये येत असल्याने सोमवारी एकही उद्योग सुरू झाला नाही.

अहवाल आल्यानंतर निर्णय 
कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची दुसरी चाचणी घेतली असून संबंधित अहवाल मंगळवारपर्यंत येण्याची शक्यता असल्याने त्यानंतरच औद्योगिक परिसर कंटेंटमेंट झोनमधून बाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरच उद्योग सुरू ठेवायचे की नाही, याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. येथील औद्योगिक वसाहतीमध्ये दालमिल, तेल प्रक्रिया, कापूस जिनिंग, फरशी, ठिबक संच, रोहित्र निर्मिती, औषधी निर्मिती आदी उद्योग आहेत.


हेही वाचा व पहा - Video : आधी फवारणी, मगच मिळणार इंधन

उद्योजक तयार
एमआयडीसीमधील उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजक तयार आहेत. प्रशासनासोबत बैठकही झाली आहे. परंतु, कंटेंटमेंट झोनमध्ये एमआयडीसीचा परिसर येत असल्याने अडचणी येत आहेत. झोनमुक्त होताच उद्योग सुरू होण्याची शक्यता आहे.
- ओमप्रकाश डागा, जिल्हाध्यक्ष, उद्योजक संघटना


 

...तोपर्यंत खरेदीला गती नाही
भुसार मालाचे खरेदी-विक्रीचे व्यवहार सोमवारपर्यंत बंद होते. आता मंगळवारपासून परवानगी मिळाली असली तरी, जोपर्यंत प्रक्रिया उद्योग सुरू होणार नाहीत तोपर्यंत खरेदीला गती मिळणार आहे. मोंढ्यात खरेदी केलेल्या तूर, सोयाबीन, कापूस यावर एमआयडीसीमधील उद्योगात प्रक्रिया होते.
- मोतीचंद जैन, अध्यक्ष, मार्केट असोसिएशन, परभणी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhokardan Theft
The decision is expected to make travel easier and safer for thousands of pilgrims travelling to and from Pandharpur.
The protesters demanded an impartial inquiry into the alleged incidents, action on examination irregularities and accountability from the Union Education Minister.
The incident also caused damage to a soybean crop, while the exact cause of the fire will be determined after a technical inspection.
Marathi News Esakal
www.esakal.com