esakal | परभणीतील दोघांनी केले कांग यात्से शिखर सर, दहा तासांत चढले पर्वत | Parbhani News
sakal

बोलून बातमी शोधा

परभणी : परभणीचे रणजीत कारेगावकर, विष्णू मेहत्रे यांच्यासह इतरांनी लेह - लडाख मधील कांग यात्से शिखर सर केले. यावेळी त्यांनी भगवा ध्वज फडकावला. Parbhani News

परभणीतील दोघांनी केले कांग यात्से शिखर सर, दहा तासांत चढले पर्वत

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : महाराष्ट्रातील दोन, दिल्ली, राजस्थान, हैदराबाद व गुजरात येथील प्रत्येकी एक जण अशा पाच राज्यातील सहा धाडशी तरूण गिर्यारोहकांनी लेह-लडाखमधील कांग यात्से (Kang Yaste Mountain) हे ६ हजार २५० मीटर उंचीचे शिखर अवघ्या १० तासांत सर केले. या मोहिमेत परभणीच्या दोघांनी सहभागी नोंदविला होता. परभणीचे (Parbhani) रणजित कारेगावकर (वय ४६), विष्णू मेहेत्रे (वय ३९) हे पाणी वाचवू, वृक्ष लावू, वाढवू , निसर्ग व वन्यजीवसंर्वधन करू असे संदेश घेऊन गिर्यारोहणात सहभागी झाले होते. राजस्थानचा संदीप सैनी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या गिर्यारोहणात भारतातातील पाच राज्यातील या गिर्यारोहकांनी एकमेकांच्या साथीने हे कठीण हिमशिखर सर केले. मोहीम प्रमुख संदीप सैनी हा अनुभवी, तरूण गिर्यारोहक, अत्यंत समयसुचकता असलेला, अभ्यासू व सकारात्मक विचारांचा धाडशी मार्गदर्शक होता.

हेही वाचा: अर्धापूर तालुक्यात ट्रकच्या धडकेत सातारच्या 'हिरकणी'चा मृत्यू

तो मानसिक स्वास्थ्य संघटनेचा संदेश घेऊन मोहीमेत सहभागी झाला होता. दिल्लीचे राहूल शर्मा (वय ३१) कचरा करू नका व सुंदर सृष्टी बिघडवू नका, आंध्र प्रदेशचा हर्षादीत्य बिजापूरी (वय २५) शेतकरी वाचवा, गुजरातचे डॉ. सत्यगांधी चिन्नम (वय २५) 'स्वस्थ रहा आणि कोविड लस घ्या' या संदेशाद्वारे ही मोहिम सर केली. लेहपासून ६० किलोमिटर अंतरावर असणाऱ्या चौकदा गावात चारचाकीने पोहोचले. तेथून १७ किलोमीटर पायी प्रवास करत कांगमारू हा १७ हजार ५०० फुट उंचीचा दुर्गम पर्वत चढून निमालीन येथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी बेसकॅम्पवर पोहोचून उणे १० सेल्सिअस तापमानात ता. १ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता गिर्यारोहणास सुरूवात झाली. सर्वजण सकाळी साडेआठ वाजता ६ हजार मीटरपर्यंत उत्साहात चालत गेले. त्या ठिकाणी उने १५ अंश सेल्सीअस तापमान होते. डोळ्यासमोर शिखर दिसत असताना वातावरणापुढे नमुन इतरांनी ६ हजार १०० मीटर ऊंचीवरच शिवरायांचा भगवा फडकवत भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करत एकमेकास अलिंगन दिले.

loading image
go to top