मुंबईचं पार्सल आता मुंबईला जाणार नाही : डॉ. हिकमत उढाण 

ud
ud
Updated on

घनसावंगी : 'सध्या मुंबईचं पार्सल मुंबईला परत पाठवून देऊ, असा विरोधकांकडून प्रचार केला जातोय. मी जरी मी पराभूत झालो तरीही घनसावंगी सोडून जाणार नाही' असा खुलासा करीत मतदारसंघाच्या २० वर्षांपासून रखडलेल्या कामासाठी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मला संधी द्या, असं शिवसेनेचे घनसावंगी मतदारसंघाचे उमेदवार डॉ. हिकमत उढाण यांनी आवाहन केले.

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठवाड्यातली पहिली सभा जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे होत आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत डॉ. हिकमत उढाण यांनी ऊसावर प्रक्रिया करण्यात येणाऱ्या नव्या कारखान्याची सुरुवात करण्यात आल्याचे सांगितले. 

डॉ. उढाण म्हणाले, 'घनसावंगी मतदारसंघात ऊसाचा मोठा प्रश्न आहे. या ऊसाचा प्रश्न सोडवण्यासाठी आणखी एक कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न होता. मात्र, त्याच्या परवानगीसाठी अडचणी येत होत्या. कारण साखर कारखाना उभारताना १५ किलोमीटरच्या अंतरात दुसरा साखर कारखाना नको होता. मात्र, इथे जवळ अनेक कारखाने असल्याने ते जमत नव्हते. त्यामुळे साखर निर्मिती न करता तिर्थपुरी ते अंतरवाली या रस्त्यावर इथेनॉल आणि डीस्टीलरी निर्मिती करण्याचा कारखाना उभारणार आहे. त्यासाठी केंद्राची परवानगीही मिळाली आहे. या नव्या कारखान्याचे उदघाटन निवडणूक झाल्यानंतर करण्यात येईल'. 

चिखलामुळे दोघांना प्रचार करणं अवघड : 
सध्या जोरात पाऊस पडतोय. या पावसामुळे घनसावंगी मतदारसंघातील रस्ते उघडे पडलेत. रस्त्यात खड्डेच खड्डे आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी विद्यमान आमदारांनी (राजेश टोपे) मुरूम टाकले. पुन्हा पाऊस झाल्याने त्या मुरमाचा चिखल झाला. आणि आता प्रचार करताना माझी आणि त्यांचीही अडचण झाली. कारण त्या चिखलातून गावागावात जायला गाडीच नसल्याचं डॉ. उढाण यांनी सभेत सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Beed Direct Railway Service Timetable Announced Train To Cover Journey In Seven Hours With Multiple Station Stops
Manoj Jarange Patil Hunger Strike Ends In Patoda Mumbai Protest Put On Hold Government Gets Three Months For Maratha Demands
Yuva Sena Workers Throw Ink at Forest Guard Over Delay in Action
Maratha Quota
Marathi News Esakal
www.esakal.com