मुलांच्या मोबाइल वेडाला पालकच जबाबदार - आबा महाजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaba Mahajan

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील बालमेळाव्यात शनिवारी (ता.२३) तहसीलदार तथा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बालसाहित्यिक आबा महाजन यांची मुलाखत पार पडली.

मुलांच्या मोबाइल वेडाला पालकच जबाबदार - आबा महाजन

उदगीर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील बालमेळाव्यात शनिवारी (ता.२३) तहसीलदार तथा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बालसाहित्यिक आबा महाजन यांची मुलाखत पार पडली. यावेळी संजय ऐलवाड आणि बालसाहित्यिक मैत्री लांजेवार आणि जान्हवी जगदाळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी आबा महाजनांनी बालसाहित्यिकांच्या प्रश्नांना उत्तरे देत उपस्थित विद्यार्थ्यांना साहित्य निर्मितीसाठी मार्गदर्शन केले.

एका प्रश्नाला उत्तर देताना आबा महाजन म्हणाले, की मी शिक्षक, तहसीलदार, साहित्य अकादमी पुरस्कार, पाठ्यपुस्तकात पाठ्य प्रकाशित होण्यासारखी अशी अनेक स्वप्ने पाहिली व मोठ्या चिकाटीने ते सत्यात उतरवली. त्यामुळे मुलांनीही छोटी छोटी स्वप्ने पाहून ती सत्यात उतरवण्यासाठी मोठ्या जिद्दीने प्रयत्न करावेत. यासोबतच त्यांनी यावेळी त्यांच्या बालपणीचे व शालेय जीवनातील किस्से सांगत आठवणींना उजाळा दिला.

उलगडला साहित्य प्रवास

लहानपणापासून आबा महाजन यांना पुस्तके वाचण्याची सवय होती. त्यावेळी बहिणाबाई चौधरी, राजन गवस, साने गुरुजी, केशवसुत, भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या अनेक थोर साहित्यिकांची पुस्तके वाचून साहित्यनिर्मितीची आवड निर्माण झाल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले.

Web Title: Parents Are Responsible For Their Childrens Mobile Craze Aaba Mahajan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top