टाकळी राजेराय - एकीकडे इंग्रजी व खासगी शाळेंचे पेव वाढत असताना दुसरीकडे माञ खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय जिल्हा परिषद शाळेत माञ यंदा विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. .गेल्या काही वर्षापासुन इंग्रजी शाळेकडे पालकांचा वाढलेला कल, शाळेत संस्थाचालकाकडुन मिळत असलेल्या सुविधा, आपले पाल्य इंग्रजी शिकले पाहिजे असा झालेला समज यामुळे जिल्हा परिषद शाळेंना उतरती कळा लागली होती. यात या शाळांची विद्यार्थी संख्याही झपाट्याने घटत आहे.परंतु याला यावर्षी टाकळी राजेराय येथिल जिल्हा परिषद शाळा अपवाद ठरली आहे. चालु शैक्षणिक वर्षात या शाळेत शंभर पेक्षा अधिक नविन प्रवेश झाले आहेत. यात इंग्रजी व उर्दु माध्यमातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात समावेश आहे..येथे जिल्हा परिषदेची मराठी माध्यमाची पहिली ते दहावी व उर्दु माध्यमाची पहिली ते सातवी पर्यंतची शाळा आहे. यात मागिल वर्षी मराठी माध्यमात २७६ तर उर्दु माध्यमात ७४ असे ३५० विद्यार्थी शिक्षण घेत होते. यातील दहावी व सातवी उर्तीर्ण होउन ४२ विद्यार्थी बाहेर गेलेत.परंतु यंदा या शाळेत नविन शंभराच्या वर प्रवेश झाले आहेत तर विद्यार्थी संख्याही चारशेवर गेली आहे. प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची शाळेत नियमितराहत असलेली उपस्थिती, पालक मुख्यध्यापक व शिक्षकांशी साधत असलेले संपर्क यामुळे हिच संख्या सव्वाचारशे ते साढेचारशे पर्यंत जाणार असण्याची शक्यता निर्माण झाली आहे..या शाळेत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह, शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता, विद्यार्थ्यांवर मुख्यध्यापक व शिक्षकांचे राहत असलेले लक्ष, वर्गाबरोबर गृहपाठावर असलेले जोर, शालेय प्रशासनाकडुन भौतिक सुविधा पुरवण्याकडे असलेला भर यामुळे विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ताही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे पालकांचा कलही परत जिल्हा परिषद शाळेकडे वळत असल्याचे चिञ येथिल शाळेत दिसत आहे..आवश्यकता अधिक शिक्षक व सुविधेचीया शाळेवर मुख्यध्यापकासह शिक्षकांची सुरू असलेली मेहनत, वाढत असलेली विद्यार्थी संख्या यामुळे आता या शाळेवर अधिकचे शिक्षक नियुक्त करण्याची गरज शालेय समिती व पालकांनी व्यक्त केली आहे. तसेच प्रशासनाकडुन संगणक कक्ष, कवायतीचे साहित्य व इतर सुविधा पुरवल्यास या शाळेस गतवैभव पुन्हा प्राप्त होईल व शाळा आयडाॅल म्हणुन नावारुपास येईल अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे..वसंत राठोड (मुख्यध्यापक) -या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर जातीने लक्ष देण्यात येत आहे. त्याचबरोबर गुणवत्ता मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पालकांनीही या शाळेस पसंती देत पाल्यांचे प्रवेश केले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.