

Jewellery Businessman Threatened With Pellet Gun After Parking Dispute in Sonar Galli Police Take Action
esakal
फुलंब्री : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सोनार गल्लीत वाहन पार्किंग करण्याच्या कारणावरून दोन सराफा व्यावसायिकांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका सराफा व्यावसायिकाने दुसऱ्या व्यावसायिकावर चक्क छऱ्यांची बंदूक रोखल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, फुलंब्री पोलिसांनी संबंधित छऱ्यांची बंदूक जप्त केली आहे. याप्रकरणी जितेंद्र वानखेडे यांच्या फिर्यादीवरून हरिष वर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.