
परळी वैजनाथ - परळी विधानसभा मतदारसंघावर सुरुवातीपासून मुंडे घराण्याचे वर्चस्व आहे. ते पुन्हा एकदा लाखाच्या वर मताधिक्य मिळवून धनंजय मुंडे यांनी सिध्द केले असून महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवत विजयश्री खेचून आणली आहे. मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासुन मताधिक्य मिळवत प्रचंड मोठा विजय प्राप्त केला आहे. विजयी होणाच धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजयी मिरवणूक काढली आहे.