Parbhani Violence Case : संविधान अवमानाच्या निषेधार्थ परळीत बंद..!
Parbhani Violence Case : भारतीय संविधान विटंबन प्रकरणी दोषींवर कडक कारवाईसाठी परळी बंद पुकारण्यात आला. या बंदला सर्व पक्ष, व्यापारी संघटना आणि आंबेडकर अनुयायांचा मोठा पाठिंबा मिळाला.
परळी वैजनाथ : परभणी येथील भारतीय संविधान प्रतिमेच्या विटंबनाप्रकरणी दोषींवर कडक कार्यवाही करावी, अशी मागणी करत सर्वपक्षीय नेतेमंडळी, व्यापारी, महासंघ व आंबेडकर अनुयायांच्या वतीने परळी बंद पुकारण्यात आला होता. या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला.