
Shivraj Divte Viral Video: महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख खून प्रकरणानंतर अगदी तशीच घटना बीडच्या परळीमध्ये घडली आहे. संतोष देशमुखांना मारलं तशा पद्धतीने शिवराज दिवटे नावाच्या युवकाला अपहरण करुन मारहाण करण्यात आली. सुदैवाने तिथे गावातले लोक पोहोचले, नाहीतर आणखी एक खून झाला असता अशी परिस्थिती आहे. या प्रकरणातील आरोपी राजरोसपणे नशा करतात, असा आरोप लोकप्रतिनिधी करीत आहेत. परळीमध्ये सर्रास ड्रग्ज, गांजा मिळतोच कसा? असा प्रश्न सुरेश धस यांनी उपस्थित केलाय.