Nagapur wan Project
sakal
परळी वैजनाथ - दीड लाख लोकसंख्येच्या परळी शहरास पाणीपुरवठा होणाऱ्या तालुक्यातील नागापूर येथील वाण प्रकल्पातील पाण्याने तळ गाठल्याने या शहरास शनिवार (ता. 10) पासून दर दहा दिवसाला एकदानागरिकांना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यंदा कमी झालेला पाऊस त्यामुळे प्रकल्पात नसलेले पाणी यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे.