
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी 18 महिन्यांनंतरही आरोपी मोकाट फिरत आहेत.
न्याय न मिळाल्यामुळे पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात विषप्राशनाचा प्रयत्न केला.
या प्रकरणात आता राजकीय हस्तक्षेप होत असून, बाळा बांगर यांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाला 18 महिने उलटून गेली, तरी अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. या प्रकरणातील ढिसाळ तपास आणि वारंवार बदलणाऱ्या तपास अधिकाऱ्यांमुळे संतप्त झालेल्या महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातच विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, पुढील 72 तास त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणार आहेत.