

Haribhau Kondal
esakal
परळी वैजनाथ : पंढरपूर आणि परळी वैजनाथ येथे देवदर्शनासाठी आलेले सेलू (जि. परभणी) येथील ७८ वर्षीय वृद्ध परळी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेतून अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी परळी वैजनाथ रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. हरिभाऊ पुंजाजी कोंडाळ (वय ७८, रा. विद्यानगर, सेलू, जि. परभणी) असे बेपत्ता झालेल्या वृद्धाचे नाव आहे.