Parli Vaijnath: परळी, औंढा, वेरूळला भोलेनाथांचा गजर; पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन

Massive Devotee Gathering at Three Jyotirlingas: पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीच्या दुहेरी योगानिमित्त परळी वैजनाथ, औंढा नागनाथ आणि वेरूळ घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी झाली.
Parli Vaijnath

Parli Vaijnath

esakal

Updated on

परळी वैजनाथ: पहिला श्रावणी सोमवार व नागपंचमी असा दुहेरी योग जुळून आल्यामुळे येथील प्रभू वैद्यनाथ, औंढा नागनाथ येथील नागनाथ आणि वेरूळ येथील घृष्णेश्वर या बारापैकी मराठवाड्यातील तीन ज्योतिर्लिंग मंदिरांत दर्शनासाठी आज शिवभक्तांनी प्रचंड गर्दी केली. ‘हर हर महादेव’चा जयघोष करीत लाखो भाविक भोलेनाथांच्या चरणी लीन झाले.

‘हर हर महादेव’, ‘प्रभू वैद्यनाथ महाराज की जय’च्या जयघोषाने परळी येथील प्रभू वैद्यनाथांचा मंदिर परिसर दणाणून गेला. पहाटेपासून भाविकांची दर्शनसाठी गर्दी होती. सायंकाळपर्यंत सुमारे दीड लाखावर भाविकांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतरही उशिरापर्यंत गर्दी कायम होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com