

परळी वैजनाथ :शहरालगत टोकवाडी- जिरेवाडी -कन्हेरवाडी मार्गे जाणाऱ्या वळण रस्त्यावर रेल्वे रुळाचे काम सुरू होणार असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जात आहे. याबाबतचा फलक मार्गावर लावण्यात आला आहे.
Sakal
परळी वैजनाथ: रेल्वे रुळ टाकणे व पुलाच्या कामाच्या खोदकामामुळे परळीचा वळ रस्ता (बायपास) वाहतुकीसाठी रविवार (ता.5) पासून बंद केला जाणार आहे. यामुळे परळी शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण पडणार आहे.
परळी -बीड- अहिल्यानगर या रेल्वे मार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे या मार्गावरील परळी रेल्वे स्थानकापासून टोकवाडी या गावादरम्यान रेल्वे रुळ टाकण्याचे काम गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे या मार्गावरून जाणारा टोकवाडी -ब्रह्मवाडी -जिरेवाडी -कन्हेरवाडी या गावालगतच्या वळण रस्त्यावर (बायपास) टोकवाडी परिसरात खोदकाम करून त्यावर रेल्वे रूळ टकणे,पुलाचे बांधकाम करणे आदी कामामुळे हा रस्ता रविवार (ता. 5 )पासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे.भूसंपादन व इतर तांत्रिक कारणामुळे हे काम रखडले होते. रखडलेल्या या कामाला आता गती मिळाली असून रेल्वे रूळ टाकण्यासाठी खोदकाम सुरू होत आहे.