Beed News: तलाठ्याचं काम, वर्षभर थांब;इशारा केले की लगेच काम!;हक्काच्या सातबाऱ्यासाठी तलाठी म्हणतो; दहा हजार द्या मग नाव लावतो

The Reality of Talathi Corruption in Parli Vaijnath: परळी वैजनाथातील तलाठी कार्यालयातील भ्रष्टाचार, जमिनीवरील नाव नोंदणीसाठी लूट, नागरिकांचा त्रास. महसूल खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहारामुळे जमीन हक्कांसाठी नागरिकांची संघर्षमय वेळ.
Beed News

Beed News

esakal

Updated on

परळी वैजनाथ: साहेब, अंबाजोगाई रस्त्यावर माझा छोटासा एक गुंठ्याचा प्लॉट आहे. तो काय खूप मोठा तुकडा नाही, पण माझ्या हक्काचा आहे. त्यावर माझं नाव लागावं, ७/१२ वर माझी नोंद व्हावी म्हणून मी तलाठी कार्यालयाचे किती उंबरठे झिजवले असतील याची गणतीच नाही. प्रत्येक वेळी आज या, उद्या या म्हणून मला फिरवलं जायचं. अखेर एका मध्यस्थामार्फत निरोप आला की, तसं होणार नाही, काहीतरी करावं लागेल. माझ्या हक्काच्या जमिनीवर माझं नाव लावण्यासाठी मला १० हजार रुपये मोजावे लागले. तेव्हा कुठे त्या सरकारी कागदावर माझ्या नावाचे अक्षर उमटले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com