
Beed Crime News: संतोष देशमुख खून प्रकरणानंतर बीडमधल्या गुन्हेगारीचं वास्तव राज्यासमोर आलेलं होतं. धनंजय मुंडेंचा उजवा हात असलेल्या वाल्मिक कराडने कशा पद्धतीने टोळ्या सक्रीय केल्या होत्या आणि तो जिल्ह्याचं प्रशासन कसं चालवायचा, हे पुढे आलेलं होतं. त्यानंतर अनेक गुन्हेगारीच्या घटना पुढे आल्या.