परतूर येथे स्कारपीओ चालकावर केला चाकूने जीवघेणा हल्ला ; दोन अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

सुभाष बिडे
Saturday, 19 December 2020

परतूर पासून पारडगाव जवळ आले असता या दोन्ही पॅसेंजरने चालक रूषी काळे यांच्या पाठीमागून धारदार शस्त्राने गळ्यात चाकू खुपसला. यात चालक रूषी काळे गंभीर जखमी झाला. त्यामुळे तो दोघांचा प्रतिकार करू शकला नाही. 

घनसावंगी (जालना) : परभणीहून पारडगाव (ता. घनसावंगी) येथे नातेवाईकाकडे जायचे असे सांगून स्कारर्पीओ किरायाने घेऊन येणार्‍या एकाने परतूर येथे एकास सोबत घेऊन पारडगाव जवळ गेले. त्यावेळी स्कारपीओ चालकावर चाकूने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. तसेच जीप घेऊन पसार झाल्याची घटना शुक्रवार (ता.18) चार वाजेच्या दरम्यान घडली. 

परभणी येथील एका व्यक्तीने पारडगाव (ता. घनसावंगी) येथे श्री.ढवळे या नातेवाईकाकडे जायचे म्हणून स्कारर्पीओ जीप किरायाने घेतली. जीप क्र. एम.एच.45 ए 9997 ने चालक रूषी काळे हे त्या व्यक्तीस घेऊन आले असता दरम्यान सदर पॅसंजर व्यक्तीने परतूरमध्ये त्यांनी एक ओळखीचा माणूस घेतला. परतूर पासून पारडगाव जवळ आले असता या दोन्ही पॅसेंजरने चालक रूषी काळे यांच्या पाठीमागून धारदार शस्त्राने गळ्यात चाकू खुपसला. यात चालक रूषी काळे गंभीर जखमी झाला. त्यामुळे तो दोघांचा प्रतिकार करू शकला नाही. 

ही घटना कळताच परतूर येथील प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी हसन गौर, परतूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी एस.डी.बांगर, परतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र ठाकरे, उपनिरीक्षक सुनील बोडखे, घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवार, पोलिस कर्मचारी गणेश शिंदे, राहूल भागीले, श्री. खरात, श्री.लोखंडे, यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर या दोन्ही पॅसेजंरने स्कारपीओ जीप घेऊन पसार झाले. चालकांस त्यास तातडीने जालना व पुढे घाटी रूग्णालय औरंगाबाद येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले. सदर चालक गंभीर जखमी झाल्याने आरोपींची नावे समोर आली नसल्याने तुर्त तरी या प्रकरणी दोन अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Partur a Scorpio driver was stabbed by two men