पाच जणांचा रेतीखाली दबून मृत्यू झाल्याने घटनास्थळी सकाळीच महिलांचा आक्रोश दिसून आला. मयतांचे नातेवाईक सकाळीच घटनास्थळी आले. यामध्ये महिलांचा आक्रोश मन हेलावणारा होता.
जाफराबाद : दिवसभर पुलाचे काम करून पत्र्याच्या शेडमध्ये रात्री झोप घेणाऱ्या मजुरावर पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास काळाने घाला घातला. रात्री अवैधरित्या वाळूची वाहतूक (Sand Transportation) करणाऱ्या टिप्पर चालकाने मजूर झोपलेल्या पत्र्याच्या समोर वाळू रिकामी केल्याने वाळू खाली दबून पाच मजुरांचा मृत्यू झाला.