esakal | पाथरी : कार्यकाळ संपताच या गावच्या सरपंचाने मानले गावकऱ्यांचे असेही आभार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सरपंचाने कार्यकाळ संपताच सोशल मीडियावर पाच वर्षे सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले. याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चिली गेली.

पाथरी : कार्यकाळ संपताच या गावच्या सरपंचाने मानले गावकऱ्यांचे असेही आभार

sakal_logo
By
धनंजय देशपांडे

पाथरी  (जिल्हा परभणी )  : राजकीय पदावर बसलेले अनेक नेते पदाधिकारी निवडणूक झाल्यावर मतदारांना बोलत नाहीत परंतु एका सरपंचाने कार्यकाळ संपताच सोशल मीडियावर पाच वर्षे सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले. याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चिली गेली.

राजकारणाची हवा लागल्यावर चांगल्या व्यक्ती ला सुद्धा बदलेले अनेक उदाहरण आहेत निवडणुकी आधी दोन्ही हात जोडणारा नेता पुन्हा मतदारांकडे दुर्लक्ष करतो हे ही आपण पाहिले आहे परंतु पाथरी तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या गुंज ( खुर्द ) येथील तरुण सरपंच गजानन वाघमारे यांनी चक्क  कार्यकाळ संपल्यावर गावकऱ्यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा -  मुख्यमंत्र्यांनी केली खासदार संजय जाधव यांची नाराजी दूर, मुंबईत बैठक -

सरपंच गजानन वाघमारे यांनी आभार मानले

शहरी भागा पेक्षा ग्रामीण भागात राजकारण करणे अवघड आहे. पक्ष व नेता निष्ठा .जातपात यासह भावकी .मुंड याचेही राजकारण केले जाते. क्षेत्र कमी व नेते जास्त यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर राजकारण केले जाते. आशा परिस्थितीत खुर्चीवर बसणाऱ्या सदस्य. चेअरमन व सरपंच यांचा विकास कामापेक्षा ग्रामस्थांची मर्जी सांभाळण्यात जास्त वेळ जातो. अशा राजकारणात कार्यकाळ संपलेला सदस्य आभार तर सोडाच पुन्हा निवडणूक लढवण्याची मानसिकता नसते .परंतु कार्यकाळ संपल्यानंतर सरपंच गजानन वाघमारे यांनी आभार मानले आहेत त्यांनी सोशल मीडियाद्वारे प्रिय गावकरी असा उल्लेख करत आज आपल्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला असून गेले पाच वर्ष आपन केलेल्या सहकार्याबदल व दिलेल्या प्रेमाबद्दल मि सर्व गावकर्याचे आभार मानतो असे लिहिले आहे. याची राजकीय क्षेत्रात चांगलीच चर्चा झाली. वाघमारे यांनी नुसते आभार नाही तर ५४ लक्ष रुपयाची पाणी पुरवठा योजना तसेच अनेक चांगली कामे केली असून ती करतांना कोणी दुखावले गेले असतील त्यांची  माफी मागितली आहे. 

ग्रामस्थांचे आभार

एका तरुणाने पाच वर्षे सरपंच पद भोगून कार्यकाळ संपल्यावर चक्क आभार व माफी मागितल्याने राजकारण्यापेक्षा एक प्रेमळ माणूस असल्याचे दाखवून दिले आहे.ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांच्या आशिर्वादानेच मी पाच वर्षे सरपंच म्हणून काम करू शकलो याची मला जाण आहे त्यामुळेच मी ग्रामस्थांचे आभार मानले आहेत.  

-गजानन वाघमारे, सरपंच ग्रामपंचायत, गुंज.    

संपादन - प्रल्हद कांबळे