Pathri Water Management : संपूर्ण नदीचे रुंदीकरण, खोलीकरणाचे काम व्हावे...नदी एक, प्रश्न अनेक

Pathri Water Management : पाथरी तालुक्यातील अनामिक नदीचे रुंदीकरण व खोलीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. या उपाययोजनेमुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल आणि पाणी साठवणुकीतून सिंचनास मदत होईल.
Pathri Water Management
Pathri Water Managementsakal
Updated on

पाथरी : पाणी हेच जीवन असले तरी नदीकाठच्या शेकडो शेतकऱ्यांना केवळ नदीच्या पाण्यामुळे जगणे नकोसे झाले आहे. हे वाचून खरे वाटणार नाही, परंतु ही वास्तविक परिस्थिती आहे आणि ती बदलण्यासाठी नदीचा उगम ते गोदावरी संगम असे रुंदीकरण व खोलीकरण होणे हाच एकमेव पर्याय आहे.

गाव शिवारात असणाऱ्या नदी-नाल्यांना लेंडी नदी किंवा त्यासारखी इतर नावे दिलेली असतात. परंतु, मानवत तालुक्यातील रत्नापूर शिवारामधून उगम होणाऱ्या या नदीला पाथरी व पुढील गावांमधील स्थानिकांनी कोणतेही नाव दिलेले नाही. त्यामुळे ही नदी आजही ‘अनामिका’ आहे. या नदीला नाव देणार तरी कसे आणि कोणते, असा प्रश्न स्थानिकांना वर्षानुवर्षापासून पडला आहे.

सुरुवातीपासून शेवटपर्यंत या नदीला खोलीकरण व रुंदीकरणाची आवश्यकता आहे. जलसंधारण अथवा विशेष प्रकल्पातंर्गत ह्या नदीचे काम होऊ शकते ते काम प्रत्यक्षात राबविण्यासाठी राजकिय नेत्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. रुंदीकरण व खोलीकरण झाल्यावरच या पट्ट्यात असणाऱ्या हजारो एकर जमिनीला वहीत करत दोन्ही हंगामातील पीक पेरणी व काढणी करता येईल पर्यायाने या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण वाढत जीवन मान उंचावणार आहे.

काय करता येईल?

या अनामिका नदीच्या पात्रामध्ये ठिकठिकाणी बंधाऱ्यांची साखळी पद्धतीने उभारून त्या पाठीमागील भागाचे खोलीकरण रुंदीकरण केल्यास पावसाळ्यातील पाणी पात्रात राहत वाहून जाण्यास मदत होईल. तर उन्हाळी हंगामातील पिकांसाठी बंधाऱ्यात साठलेल्या पाण्यामुळे सिंचनासाठी पाणी मिळेल.

नदी अरूंद असल्याने गावात, शेतात पाणी येत असेल तर ग्रामस्थांनी लोकसहभागातून व लोक चळवळ उभी करून नदीचे काम करणे गरजेचे आहे. तर ‘चला जाणूया नदी’ या कार्यक्रमांतर्गत सर्व गावकऱ्यांनी आपल्या नदीचा नैसर्गिक प्रवाह जाणून घेत नदीच्या प्रवाहात कोणत्याही प्रकारे अतिक्रमण, अडथळा न करता नैसर्गिक नदीच्या नैसर्गिक प्रभाव कायम ठेवावा.

— शैलेश लाहोटी उपजिल्हाधिकारी, पाथरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Drought Free Plan River Linking Project Gets Push As Fadnavis Says Work Could Begin This Year
Koyna dam 19387 cusecs water release
The project is expected to improve irrigation, drinking water supply and water storage in Solapur, Satara and Pune districts.
mulshi dam water release
Marathi News Esakal
www.esakal.com