Beed News : दवाखान्याचे बिल न भरता डॉक्टरला मारण्याची धमकी
Medical Violence : बीडमधील श्रीनारायणी चाइल्ड केअरमध्ये उपचार घेत असलेल्या बालकाचे वडील ८३,६०० रुपयांचे बिल न भरता रुग्णालयातून मुलाला जबरदस्तीने घेऊन गेले आणि डॉक्टरला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बीड : शहरातील श्रीनारायणी चाइल्ड केअर युनिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या बालकाच्या वडिलांनी ८३ हजार ६०० रुपयांचे बिल न भरता रुग्णालयातून बालकाला जबरदस्तीने नेले.