
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या तीन ‘एमए’च्या दोन बीए आणि एक एमएस्सीच्या विषयांचे निकाल मंगळवारी (ता. तीन) जाहीर झाले. परीक्षा व मूल्यमापन मंडळाने एमए पाली बुद्धिझम, एमए अरेबिक आणि एमए शारीरिक शिक्षण, बीए एमसीजे, बीए होमसायन्स, एमएस्सी फॉरेन्सिक सायन्स या विषयांच्या निकालाने उन्हाळी परीक्षांच्या निकालाला सुरवात केली.