
फुलंब्री : शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी उत्साहात रमजान ईद साजरी केली. सकाळी 9 वाजता पानवाडी रस्त्यावरील ईदगाह मैदानावर पारंपरिक पद्धतीने सामूहिक नमाज अदा करण्यात आली. यावेळी मुस्लिम समाज बांधवांनी जगात सुख-शांती नांदावी आणि यंदा समाधानकारक पाऊस पडावा यासाठी दुवा मागितली आहे.