NIC Website Missing Villages Crop Relief News : एनआयसीच्या संकेतस्थळावरून फुलंब्री तालुक्यातील चार गावे गायब; तांत्रिक अडचणीमुळे हजारो शेतकऱ्यांची अग्रीम मदत धोक्यात

Technical Glitch Threatens Farmer Relief : पाल, एकघर पाडळी, पेंडगाव आणि बिस्मिल्लाखावाडी गावांची नावे पोर्टलवर उपलब्ध नसल्याने याद्या अपलोड करणे अशक्य; तहसीलदारांकडून पाठपुरावा सुरू
"Four villages in Phulambri taluka missing on the NIC website."

"Four villages in Phulambri taluka missing on the NIC website."

Sakal

Updated on: 

फुलंब्री : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे नुकसान झाले, आर्थिक संकट ओढवले आणि आता शासनाकडून मिळणाऱ्या अग्रीम मदतीची प्रतीक्षा असतानाच तांत्रिक अडचणीचा नवा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. फुलंब्री तालुक्यातील पाल, एकघर पाडळी, पेंडगाव आणि बिस्मिल्लाखावाडी या चार गावांची नावे राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) संकेतस्थळावर उपलब्ध नसल्याने महसूल विभागाला शेतकऱ्यांच्या मदतीच्या याद्या अपलोड करता येत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या चार गावांतील हजारो शेतकरी अग्रीम मदतीच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...