
फुलंब्री : फुलंब्री शहरातील गट नंबर 17 मध्ये बनावट एन.ए.४४ प्रकरण असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सातबाऱ्यावर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी अकृषकची नोंद कशाच्या आधारावर घेतली हा प्रश्न निर्माण झाला आहे. तहसीलदार यांच्या माध्यमातून चौकशी समिती गठीत केली जाणार असून खोटी नोंद घेणारे तलाठी अन् मंडळ अधिकाऱ्यावर टांगती तलवार कायम आहे.