

फुलंब्री : फुलंब्री ग्रामीण रुग्णालयामध्ये शेवता येथील दत्तू बेडके यांचा शवविच्छेदनाचा मृतदेह तब्बल दोन तास डॉक्टरांच्या हद्दीच्या वादात अडकला होते. याप्रकरणी गुरुवारी 20 मार्च रोजी सकाळ मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेऊन फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुराधा चव्हाण यांनी शनिवारी ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट देऊन ग्रामीण रुग्णालयाचे अधिकाऱ्यांची झाडाझडती केली. रुग्णांची अवहेलना होणार नाही याची यापुढे काळजी घेण्याची तंबी आमदार चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.