prashant nagare and sushmesh pradhan
sakal
फुलंब्री - नगरपंचायत निवडणूक २०२५ ने शहराच्या राजकारणात भावनिक आणि ऐतिहासिक वळण घेतले आहे. २०१७ च्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या मुलांनी तब्बल आठ वर्षांनंतर त्याच राजकीय मैदानात विजय मिळवत वडिलांचा सन्मान पुन्हा एकदा प्रस्थापित केला. त्यामुळे ही निवडणूक केवळ राजकीय निकाल न राहता पिढ्यान्पिढ्यांच्या संघर्षाची कहाणी ठरली आहे.