

Heart Attack Patient Allegedly Turned Away At Phulambri Rural Hospital MLA Suhas Shirsat Seeks Action Health Minister Orders Inquiry
esakal
फुलंब्री : हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मृत झालेल्या रुग्णाला तातडीने उपचार देण्याऐवजी ग्रामीण रुग्णालयाच्या गेटबाहेरच थांबवून खासगी रुग्णालयात शॉक देण्यासाठी घेऊन जाण्याचा सल्ला दिल्याचा धक्कादायक प्रकार फुलंब्री येथे समोर आला आहे. फुलंब्रीत लाईनमन संदीप गौरा यांच्याबाबतीत घडलेल्या या प्रकाराची आमदार सुहास शिरसाठ यांनी गंभीर दखल घेत आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांच्याकडे शनिवारी (ता.२९) तक्रार केली. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून नोटीस बजावण्यासह कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.