Phulambri: वारेगाव ग्रामपंचायतच्या पाठपुराव्याला यश, अश्वारूढ पुतळा उभारण्याला शासनाचा हिरवा कंदील
नवनाथ इधाटे
Phulambri : फुलंब्री तालुक्यातील वारेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली होती. या ग्रामपंचायतीच्या पाठपुरावा अखेर यश मिळाले असून निवासी जिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी अटी शर्तीच्या अधीन राहून अश्वारूढ पुतळा उभारण्याला परवानगी दिली आहे.
फुलंब्री तालुक्यात बहुतांश गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती व अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्याच धर्तीवर तालुक्यातील वारेगाव येथील ग्रामपंचायतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे 28 सप्टेंबर 2022 रोजी परवानगी मागितली होती. त्यावरून महाराष्ट्र शासनाच्या स्मारक शासन निर्णयाच्या अधीन राहून 18 जून 2024 पुतळा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळा उभारण्यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीचा सविस्तर अहवाल आल्यानंतर निवासी जिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी अटी शर्तीचे अधीन राहून वारेगाव येथील ग्रामपंचायतीने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या मागणीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे गावात शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला.
• या आहेत अटी शर्ती •
पुतळा उभारल्यानंतर कायदा व सुव्यवस्थाची अडचण निर्माण होणार नाही याची सर्वस्व जबाबदारी संस्थेचे राहील.
भविष्यात रस्ते रुंदीकरण किंवा विकास कामात पुतळा आल्यास सदरील जागेवरून स्थलांतर करताना विरोध न करता स्वखर्चाने स्मारक संस्थेने दुसऱ्या नियोजित उभारावे.
पुतळ्याची देखभाल व पावित्र्य राखण्याची जबाबदारी संस्थेची राहील.
पुतळा उभारणीचा पूर्ण खर्च संस्थेने करावा, शासनाकडे कुठल्याही निधीची मागणी करू नये.
पुतळ्याची व परिसराची दर पंधरा दिवसांनी स्वच्छता करण्याची जबाबदारी संस्थेची राहील.
पुतळ्याची दैनंदिन देखभाल व भविष्यात येणाऱ्या दुरुस्तीचा खर्च संस्थेने करावा.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. आमच्या या मागणीला अखेर यश आले असून अटी शर्तीच्या अधीन राहून शासनाने पुतळा उभारण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे गावातील शिवप्रेमी आनंद व्यक्त करीत आहे.
- रत्नप्रभा संदीपराव बोरसे, सरपंच वारेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

