
छत्रपती संभाजीनगर : फुले-आंबेडकरी विचार आता जगभरात पोचले असून या महामानवांच्या विचारांचा जागर केला जात आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती दुबईतही थाटात साजरी करण्यात आली. यानिमित्त शिक्षण, समता आणि सामाजिक परिवर्तनाच्या संकल्पाने हा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.