उमरगा - पिकअप जीप व दुचाकीची जोरदार धडक बसल्याने तिघांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली. उमरगा-लातूर मार्गावर सोमवारी (ता. १७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास माडज पाटीजवळील अमराईसमोर हा अपघात झाला.
या बाबतची प्राथमिक माहिती अशी की, मंगळूर (ता. औसा) येथील दिपक वसंत रामपूरे (वय-२७) व आकाश सुर्यकांत रामपूरे (वय-२५) हे दोघे सख्ये चुलत भाऊ कांही कामानिमित्त उमरगा शहरात आले होते.
काम आटोपून ते दुचाकीवरून (क्र. एम एच २५ - ए एन ०५५४) परत गावाकडे निघाले असता, एक ट्रक चालक पीक ॲपला (क्र. एम एच २५ पी ३४०८) धडक देऊन निघून जात असताना, याच क्षणी पीक ॲप चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दिपक रामपूरे, आकाश रामपूरे या सख्या चुलत भावांचा मृत्यु झाला तर जीपमध्ये चालकाच्या बाजुला बसलेल्या येळी (ता. उमरगा) येथील दिंगबर गिरजप्पा कांबळे (वय-५७) या शेतकऱ्याचा मृत्यु झाला. तर जीप चालक संतोष स्वामी व मारुती रेड्डी रा. दोघेही येळी (ता. उमरगा) जखमी झाले आहेत.
आकाश रामपूरे बी. फॉर्मसीचे शिक्षण पूर्ण करून मंगळूर येथे औषधे विक्रीचे दुकान चालवत होता. अपघातग्रस्त जीप येळी येथील आहे. दरम्यान अपघात झाल्यानंतर तिघे रस्त्यावर पडलेल्या स्थितीत होते. एकही वाहन थांबत नव्हते.
माडज येथील वैजिनाथ उर्फ नाना काळे यांनी पळसगांव (ता. उमरगा) येथील अजय कदम यांची उमरग्याकडे निघालेल्या पिकअप जीप थांबवली. या दोघांनी तिघांना पहिल्यांदा खाजगी रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी तपासून तिघांनाही मृत घोषित केले.
तेथून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या वेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत भराटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.