

Jalna News
esakal
कुंभार पिंपळगाव: कुंभार पिंपळगावसह परिसरात मोठ्या प्रमाणात चिंचेची झाडे असून यावर्षी चिंचाही चांगल्या लगडल्या होत्या. तसेच बाजारात चिंचेला भावही बऱ्यापैकी होता. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे चिंचा भिजल्याने चिंचेच्या भावात क्विंटलमागे पाचशे रुपयांची घसरण झाली.