सरपंचपदासाठी गावोगावी मोर्चेबांधणी

बाबासाहेब ठोंबरे
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

पीरबावड्यासह गेवराई गुंगी, गेवराई पायगा, नरला भावडी या गावांत होणार निवडणूक 

पीरबावड्यासह गेवराई गुंगी, गेवराई पायगा, नरला भावडी या गावांत होणार निवडणूक 
पीरबावडा - पीरबावडा (ता. फुलंब्री) परिसरातील नरला-भावडी, गेवराई गुंगी, गेवराई पायगा या चार गावांतील ग्रामपंचायतींचा कार्यकाल नोव्हेंबरमध्ये संपत असल्याने नवीन ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी गावातील पुढाऱ्यांनी चालू केली आहे. सरपंच थेट जनतेतून निवडला जात असल्याने सक्षम उमेदवार शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे. आपापल्या कार्यकर्त्यांमार्फत गावातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. ज्या गावात सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण गटासाठी सुटले आहे तिथे निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. सरपंचपदाचे डोहाळे लागलेल्यांनी पॅनेलची तयारी सुरू केली असून आपल्या पॅनेलला सदस्यपदासाठी असा उमेदवार निवडायचा की त्याच्या मतदानाचा फायदा सरपंचपदासाठी होईल.

गाव व सरपंचपदाचे आरक्षण
पीरबावडा - सर्वसाधारण गटातील महिला
गेवराई गुंगी - सर्वसाधारण गटातील पुरुष
गेवराई पायगा - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नरला-भावडी - सर्वसाधारण पुरुष 
 

निवडणूक कार्यक्रम
१५ ते २२ सप्टेंबर दरम्यान अर्ज दाखल कारणे.
२५ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी.
२७ सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेणे.
सात ऑक्‍टोबरला मतदान.

सदस्यांव्यतिरिक्त असेल सरपंचपदाचा उमेदवार
निवडून येणारा सरपंच हा प्रभागातील सदस्य संख्येपेक्षा अतिरिक्त असणार आहे. जसे की, ज्या ठिकाणी सात सदस्य संख्या असेल तेथे आठवा सरपंच, नऊ सदस्य संख्या तेथे दहावा सरपंच, अकरा सदस्य संख्या तेथे बारावा सरपंच याप्रमाणे असणार आहे.

Web Title: pirbawada marathwada news grampanchyat election