जिंतूरमध्ये तात्पुरत्या व विशेष दुरुस्ती कामाच्या योजना लालफितीत अडकल्या

तालुक्यात यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून उन्हाची तीव्रता जाणवू लागली. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी खोल गेल्याने ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांचे जलस्त्रोत आटले.
जिंतूर नगरपरिषद
जिंतूर नगरपरिषद
Updated on

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : पावसाळा तोंडावर आलातरी पावणेदोन (Rain season) महिन्यापूर्वी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या तात्पुरत्या आणि विशेष दुरुस्ती करावयाच्या पाणीपुरवठा (Jintur water suplay ) योजनांची कामे अजून निविदास्तरावरच अडकली आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Plans- for temporary- and special- repair- work- in Jintur- got- stuck- panding)

तालुक्यात यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून उन्हाची तीव्रता जाणवू लागली. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी खोल गेल्याने ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांचे जलस्त्रोत आटले. त्यामुळे अनेक गावे, तांडे, वाड्या वस्त्यांमध्ये नागरिकांना उन्हाचे चटके सोसत पिण्याच्या पाण्यासाठी दूरदूरपर्यंत भटकंती करावी लागत आहे. परंतु संचारबंदीच्या कारणास्तव पंचायत समितीच्या पाणीपुरवठा पुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. तरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कठीण परिस्थिती असलेल्या गावातील योजनांची विशेष दुरुस्ती करण्यासंदर्भात व तात्पुरत्या योजना राबविण्याबाबत प्रशासनाला चार महिन्यापूर्वी प्रस्ताव सादर केले होते.

हेही वाचा - पुण्यात ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेपाठोपाठ राज्य सरकारनेही खबरदारीच्या उपायांना प्राधान्य दिले आहे

हनवतखेडा, दगडधोंडे व बेलुका येथील योजनांची विशेष दुरुस्ती करण्यासाठी तसेच आडगाव- बाजार, केहाळ, कोरवाडी तांडा, चारठाणा, रुपनरवाडी,लिंबाळा, धमधम, बामणी, वाघी- धानोरा, नवहाती तांडा, बोर्डी, जांब (बुद्रुक) येथे तात्पुरती पाणीपुरवठा घेण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. यासर्व योजनांच्या कामासाठी एकूण ७७ लाख ४६ हजार रुपये खर्च अपेक्षित असून त्यास मार्च अखेरीस प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे. परंतु आता पावसाळा तोंडावर आलातरी ही कामे अद्यापपर्यंत निविदा स्तरावर असल्याने या भागातील ग्रामवासियांचे पाण्यावाचून हाल होताहेत. याकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष दिल्यास पाण्याची गैरसोय दूर होऊन तळपत्या उन्हात दिलासा मिळेल अशी या भागातील जनतेला अपेक्षित आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com