pm care fund
pm care fundpm care fund

PM CARES Fund : उस्मानाबादकरांनाे! जिल्ह्यातील व्हेंटिलेटर पडलेत धूळ खात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. राज्यासह जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था अपूरी ठरताना दिसत आहे

उस्मानाबाद: पंतप्रधान निधीतून कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी उपलब्ध झालेले व्हेटींलेटर अत्यंत खराब दर्जाचे असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्याला मिळालेल्या 80 व्हेटिलेंटरपैकी दहा व्हेटींलेटर बंद पडले असून ते धुळ खात पडले आहेत. एका बाजूला रुग्ण व्हेंटीलेटर अभावी दगावत असून दुसऱ्या बाजुला मिळालेली यांत्रिक साधने ही निकामी असतील तर नागरिकांनी आता कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. राज्यासह जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था अपूरी ठरताना दिसत आहे. जिल्ह्याच्या पातळीवर ऑक्सिजनची व्यवस्था करुन त्या पध्दतीने साधे ऑक्सीजन बेडची संख्या वाढविण्याचे काम येथील प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यासाठी पंतप्रधान फंडातून आलेल्या व्हेंटिलेटरची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्यावर विसंबून राहणे देखील अडचणीचे ठरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

pm care fund
मंत्री भुमरे यांनी मागितली बिनशर्त माफी पण माफीनामा स्वीकारण्यास खंडपीठाचा नकार

रुग्णालयाच्या प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या व्हेंटीलेटरची गुणवत्ता चांगली नाही, यामुळे दिलेल्या 80 पैकी तब्बल दहा व्हेंटीलेटर सध्या बंद अवस्थेत आहेत. ही यंत्रणा चायनीज कंपनीच्या असल्याने त्याचा टिकण्याचाही भरवसा राहिलेला नाही. 45 पेक्षा ऑक्सिजनचे प्रेशर कमी झाल्यानंतर ते बंद होत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी ऑक्सिजनची पातळी किमान 45 च्या पुढेच ठेवावी लागत आहे. गाजावाजा करत केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून दिलेले व्हेंटिलेटर या गुणवत्तेचे असल्यावर प्रशासनसुध्दा त्याची हमी घेत नसल्याचे चित्र आहे.

pm care fund
शाळा बंदमुळे पाच रुपयांत मिळणारं 'अस्मिता प्लस' पॅड २२ रुपयांना!

सरकारने दिलेल्या साधनसामुग्रीवर प्रशासनालाही काही बोलता येत नसल्याचे चित्र आहे, त्यामुळे प्रशासनाची अवस्था तोंड दाबून बूक्क्यांचा मार असा झाला आहे, जवळपास सर्वच व्हेंटीलेटरची अशी अवस्था असल्याने याबाबत अत्यंत सजग राहुन काम करावे लागत असल्याची बाब प्रशासनाने मांडली आहे. सध्याची परिस्थिती पाहता रुग्णांची ऑक्सीजनची पातळी झपाट्याने कमी होत आहे, तसेच व्हेंटीलेटर बेडसाठी वेटींग करण्याची वेळ आली आहे. त्यातही दिलेल्या व्हेंटीलेटरची अशी परिस्थिती असेल तर रुग्णांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसुन येत आहे. कौतुकाने दिलेल्या या व्हेंटिलेटर्सपैकी दहा व्हेंटीलेटर्स शोभेच्या वस्तु म्हणुन धुळ खात पडल्याचे वास्तव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com