पीएम किसानचे पैसे बॅंकेकडून होल्ड

file photo
file photo

नांदेड : पंतप्रधान किसान योजनचे दोन हजार रूपये शेतकऱ्यांच्या नावे बँकेत जमा झाले. परंतु काही बँकाच्या शाखात शेतकऱ्यांना मिळत नाहीत. थकीत कर्ज असल्याचे कारणे देत ते तातडीच्या मदतीचे पैसे होल्ड करून शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्व बँकांना सुचना देवून होल्ड केलेले किंवा अन्य कारणांनी थांबवलेले किसान सन्मान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी निर्देशित करावे अशी मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्याकडे केली आहे.

बॅंकेकडून पैसे होल्ड
लॉकडाऊनच्या दरम्यान सर्व उद्योगधंदे इंडस्ट्रीज बंद असताना शेतीचे कामे सुरू आहेत.सध्या ग्रामीण भागात हळद काढण्याचे व अन्य कामे चालू आहेत. लॉकडाऊनच्या दरम्यान शेतकऱ्यांना सरकारची तातडीची मदत म्हणून पंतप्रधान सन्मान योजनेचे प्रत्येकी दोन हजार रुपये काही दिवसानंतर देण्याऐवजी आत्ताच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडीफार तरी आर्थिक मदत होणार होती परंतु काही बँकिंगच्या शाखेत शेतकऱ्यांचे हे पैसे होल्डच्या नावाखाली थांबवून घेतले जात आहेत. 

विविध कारणाने पैसे नाकारले
कोणाला थकीत कर्जाचे तर कोणाला अन्य कारणे देऊन शेतकऱ्यांना या मदतीपासून वंचित ठेवण्याचे काम काही बँकेच्या शाखेत होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. या बाबत शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन करून सर्व बँकांना सूचना देऊन शेतकऱ्यांना मिळालेले पंतप्रधान सन्मान योजनेचे पैसे न थांबवता त्यांना ते तातडीने देण्यासाठी निर्देशित करावी अशी मागणी केली.

वृत्तपत्र वितरण करणाऱ्यांना किट वाटप 
लोहा शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटप करण्यात आले. लोहाचे उपनगराध्यक्ष केशव मुकदम, नगरसेवक दता वाले, एसटी पार्सलचे व्यवस्थापक गिरीश चन्नावार यांच्या हस्ते वृत्तपत्र विक्रेत्याना जीवनावश्यक वस्तूंच्या किट देण्यात आल्या. वृत्तपत्र विक्रेते जीव धोक्यात घालून कोरोना काळात काम करीत आहेत. 

सेनिटायझरचे वाटप
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांना कोरोनाच्या निर्जंतुकीच्या फवारणीसाठी सोडियम हायपोक्लोराइट १२० लिटर देण्यात आले. यावेळी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर, मराठा उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, नागनाथ नकुलवाड उपस्थित होते. कोरोना आजाराविषयी जनतेची काळजी घेत असलेल्या तामसा पोलिस स्टेशनला कोरोना निर्जंतुकीकरणासाठी वीस लिटर सोडीयम हायपोकलोराइड, मास्क व सुरक्षा किट पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी आज तामसा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्वे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. यावेळी वडगावचे माजी सरपंच गोविंद पवार, अनिल सुरवसे, टिनू अग्रवाल, नागनाथ नकुलवाड उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com