Vidhan Sabha 2019 : मोदींच्या सभेच्या बंदोबस्ताहून परतणारी पोलिस व्हॅन पलटली

pm narendra modi rally police van accident in parali 9 Police injured
pm narendra modi rally police van accident in parali 9 Police injured

बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या बंदोबस्तावरुन बीडकडे परत येत असलेली पोलिस व्हॅनचा रॉड तुटल्याने पलटी होऊन रस्त्याच्या खाली कोसळली. या अपघातात नऊ पोलिस जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता. १७) साडेपाच वाजता बीड - परळी राज्य मार्गावरील सिरसाळा - दिंद्रुड रोडवर घडली.

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होती. सभेसाठी तगडा पोलिस बंदोबस्त लावला होता. दरम्यान, सभा संपल्यानंतर बंदोबस्तासाठी गेलेले जिल्हा पोलिस दलातील आरसीपीचे जवान एका व्हॅनमधून बीडकडे येत होते.

बीड - परळी रोडवर सिरसाळा ते दिंद्रुडदरम्यान पोलिस व्हॅनचा रॉड तुटल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत व्हॅन बाजुने एका झाडाकडे वळविली. झाडावर आदळून पलटी होऊन रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात पडली. त्यात नऊ पोलिस जखमी झाले. एकाचा पाय फ्रॅक्चर झाला असून एकाचे दात तुटले आहेत तर एकाच्या नाकाला जखम झाली आहे. इतर सहा जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. तीन जखमींना जिल्हा रुग्णालयात तर सहा जणांना माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com