PM Modi Shirdi Visit
PM Modi Shirdi Visit

PM Modi Shirdi Visit: ४० वर्षांची प्रतिक्षा संपली; विखे पाटलांनी मानले PM मोदींचे आभार

Published on

PM Modi Shirdi Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (आज) २६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि गोव्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात जाऊन पूजा केली. मोदी यांनी शिर्डीत अनेक विकासकामांचे लोकार्पण केले. यानंतर मोदींनी काकडीत शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली.

या मेळाव्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. नगर जिल्हा संताची भूमिका आहे. ४० वर्षांची प्रतिक्षा निळवंडे काला उद्धाटनामुळे ही संपली आहे. या आणखी उशीर झाला असता मात्र देवेंद्र फडणवीस व मधूकर पिचड यांनी योग्या पाठपुरवठा केला.

विश्वनेता नरेंद्र मोदी आमच्या भूमित आल्यामुळे मी आनंदी झाली. महाराष्ट्रात दु्ष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे पाणी देण्याचे वचन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. योजनांची अंमलबजावणी करण्यात नगर जिल्हा एक नंबर आहे, असे विखे पाटील म्हणाले.

PM Modi Shirdi Visit
Maratha Reservation: "PM मोदींना गरिबांच्या प्रश्नांची जाण राहिलेली नाही"; जरांगे आता केंद्र सरकारला आणणार जेरीस!

मोदींने केले अनेक विकासकामांचे लोकार्पण

  • शिर्डीत ७ हजार ५०० कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण

  • शिर्डी संस्थानच्या नव्या इमारतींचं लोकार्पण केले.

  • निळवंडे धरणाच्या कालव्याचं लोकार्पण केले.

  • मोदी यांनी शिर्डीत दर्शन रांग संकुलाचं उद्धाटन देखील केले. या संकुलाचे २०१८ मध्ये भूमिपूजन केले होते. (Latest Marathi News)

PM Modi Shirdi Visit
Jayant Patil: जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट,'धरणग्रस्तांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी...'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com