नांदेड : वाळू घाटावर पोलिसांची धाडशी कारवाई 

truck
truck

नांदेड : मांजरा नदीतून गंजगाव (ता. बिलोली) येथील वाळू घाटावर पोलिसांनी कारवाई केली. अवैध वाळू उपसा करणाऱ्या कंत्राटदारांना झटका देत घाटावरुन ३८ ब्रास वाळूसह सात ट्रक व दोन जेसीबी असा 87 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (ता. ११) दुपारी केली. 

बिलोली उपविभागीय पोलिस अधिकारी सिध्देश्‍वर धुमाळ यांनी आपल्या पथकासह मांजरा नदी घाटावर गंजगाव येथे कारलवाई केली. या घाटाच्या अनेक तक्रारी त्यांच्याकडे आल्या होत्या. यावरून त्यांनी कारवाई केली. या घाटावर अनेकवेळा पोलिस व महसुल विभागाच्या वतीने कारवाई करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला होता. तरीही तेलंगनातील व माहाराष्ट्रातील काही वाळू माफिया आपले उखळ पांढरे करण्यासाठी अवैध वाळू उपसा करीत आहेत. पोलिसांनी प्रविण रेड्डी (संघशक्ती कन्सट्रक्शन), देवेंद्र रेड्डी आणि नविन रेड्डी या तिघांना ताब्यात घेतले.

गट क्रमांक ३५४, ३५३,३५६, ३५७ आमि ३५८ मधील शासकिय वाळू घाटावरून चोरी करीत होते. पोलिसांनी ट्रक (एपी२५ एक्स ६८६९, एपी१६टीयु८८७२, एपी२५ टीयु०२४२, एमएच १२ एफसी ६४२२, एमएच४३वाय९२२२, एमएच२६एडी-१५०७ ) आणि दोन जेसीबी व अन्य साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. या वाहनांचे चालक व मालक यांच्यावर पोलिस हवालदार माधव वाडेकर यांच्या फिर्यादीवरुन बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक भगवान धबडगे हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com