
छत्रपती संभाजीनगर : शहरातून सातवर्षीय बालकाचे अपहरण करून दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी, पिस्टल व काडतुसे पुरविणाऱ्या मुख्य आरोपीला चाकण (पुणे) येथून रविवारी (ता. नऊ) पहाटे एक वाजता अटक केली. विवेक ऊर्फ साजन विभुती भूषण ऊर्फ महोतो (वय २५, रा. संगमटोला, पोस्ट. तेंदुनी, ठा. जगदशपूर, जि. भोजपूर, राज्य बिहार) असे आरोपीचे नाव असून त्याला १७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.