Marathi Paper Leak : मराठीची प्रश्नपत्रिकेतील प्रश्न लिक करणारा अटकेत; बदनापूर येथील उत्तरपत्रिका प्रकरण, तिघे पोलिस कोठडीत
Badnapur News : बदनापूर येथील दहावीच्या मराठी विषयाची प्रश्नपत्रिका लिक प्रकरणी पोलिसांनी शनिवारी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात उत्तरलेखकाचा शोध सुरु असून, आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
जालना ः बदनापूर येथे दहावीचा मराठी विषयाची परीक्षा सुरू असताना प्रश्नपत्रिकेतील प्रश्न लिक करणाऱ्या खाजगी शाळेवरील एका शिपायासह एकूण तीन जणांना पोलिसांनी शनिवारी (ता.२२) अटक केली.