Bidkin Bribe Case : टिपर सुरू ठेवण्यासाठी पोलिस हवालदाराची महिन्याला एक हजारांची मागणी; पोलिस हवालदारावर एसीबीच्या जाळ्यात

पोलिस ठाण्याच्या हद्दीत बांधकाम साहित्याची वाहतूक करणारे टिपर सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी पोलिस हवालदाराने मागितला हप्ता.
Bribe Case

Bribe Case

sakal

Updated on

- रविंद्र गायकवाड

बिडकीन - पोलिस ठाण्याच्या हद्दीत बांधकाम साहित्याची वाहतूक करणारे टिपर सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी महिन्याला हप्ता मागितल्याच्या आरोपावरून बिडकीन पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदारावर जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली. एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिस हवालदार भारत लालचंद चव्हाण (वय-४६) याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. ही कारवाई बुधवारी (२ सप्टेंबर) पैठण-बिडकीन मार्गावरील एमआयडीसी मुधलवाडी परिसरात करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com