

The operation has sparked discussion over which police station deserves credit, as the chase began in Shevgaon but the final seizure was made within Pachod police limits.
Sakal
पाचोड : अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इनोव्हा कारचा शेवगाव पोलिसांनी तब्बल ५० ते ६० किलोमीटर पाठलाग केला. दरम्यान, ही कार पाचोड (ता.पैठण) पोलिस ठाणेतंर्गत विहामांडवा गावाजवळ अपघातग्रस्त झाली. त्यानंतर शेवगाव पोलिसांनी पाचोड पोलिसांच्या मदतीने कारवाई करत वाहनासह सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, या कारवाईनंतर ती नेमकी कोणत्या पोलिस ठाण्याची कारवाई, यावरून शेवगाव आणि पाचोड पोलिसांमध्ये बिनसल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.बाळू बाबाराव बहिरवाळ (वय 30 वर्षे) रा.घोसापुरी (ता. जि. बीड) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.