esakal | खाकीला कलंकीत करणारा पोलिस निलंबीत
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हप्तेखोर पोलिस कर्मचारी खुशाल तुपदाळे याला निलंबीत केले आहे. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी त्याच्या निलंबनाचे आदेश शनिवारी (ता. १८) सकाळी काढले.

खाकीला कलंकीत करणारा पोलिस निलंबीत

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : महामार्गावर थांबून ये- जा करणाऱ्या मालवाहतुक ट्रकला अडवून चालकांकडून हप्ते मागणारा हप्तेखोर पोलिस कर्मचारी खुशाल तुपदाळे याला निलंबीत केले आहे. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी त्याच्या निलंबनाचे आदेश शनिवारी (ता. १८) सकाळी काढले.
 
नांदेड पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस हवालदार सलीम बेग (बन १५६३) याने विनापरवानगी तेलंगणात जावू आपले कुटूंब आणून त्यांची वैद्यकीय तपासणी न करता आपल्या पोलिस वसाहतीतील घरात आणले. वरिष्ठांची परवानगी न घेता व कोव्हीड- १९ सारखा बंदोबस्त असतांना त्यांने आपल्या कर्तव्यात केलेली चुक अक्षम्य असल्याने ता. १५ एप्रील रोजी निलंबीत करण्यात आले होते. सध्या त्याचे कुटुंब व तो स्वत: क्वारंटाईन आहे. 

हेही वाचालॉकडाउन : महावितरण, मिस कॉल व एसएमएस वरुन नोंदवा तक्रार

पोलिस शिपाई खुशाल परमेश्‍वर तुपदाळे

ही घटना ताजी असतांनाच देगलुर पोलिस ठाण्यात चालक या पदावर कार्यरत असलेला पोलिस शिपाई खुशाल परमेश्‍वर तुपदाळे हा शासकिय वाहन घेऊन देगलुर ते नर्सी रस्त्यावरून मालवाहतुक करणाऱ्या ट्रकला आडवून चालकांकडून पैसे मागत असल्याचा अहवाल देगलुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान धडबडे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरवदे यांच्याकडे पाठविला. यावरून श्री. सरवदे यांनी यात तथ्य तपासून पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्याकडे पाठविला. सध्या कोरोनचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. तर दुसरीकडे खाकीला कलंकीत करण्याचे काम काही पोलिस कर्मचारी करत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने श्री. मगर यांनी खुशाल तुपदाळे याला निलंबीत केले आहे. तो कोणाच्या सांगण्यावरून हप्ते मागत होता याचीही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

येथे क्लिक करा Video : लॉकडाउनमध्ये कामगारांच्या हाताला काम दिल्यास पोटाचा प्रश्न सुटेल

एका आठवड्यात दोन पोलिसांना निलंबीत 

रस्त्यावरून य- जा करणाऱ्या भूसा वाहतुक व धान्य वाहतुक करणाऱ्या ट्रक चालकांना अडवून दमदाटी करुन त्यांच्याकडून हप्ते वसुल करीत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी कठोर भुमिका घेत त्याला निलंबीत केले आहे. एका आठवड्यात दोन पोलिसांना निलंबीत करण्यात आल्याने कामचुकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. काही कर्मचारी जर खाकीला कलंकीत करण्याचा प्रयत्नकरत असल्यास थेट माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.     

loading image